शेतकऱ्यांना दिलासा : नमो शेतकरी महासन्मान निधीला मंजुरी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १० ऑक्टोबर २०२३

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मिळणार वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना याची घोषणा केली होती.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल 2023 ते जून 2023 या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. यासाठी 1,720 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या बजेटमध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम