चाळीसगाव येथे खान्देशातील पहिल्या अत्याधुनिक जिनिंग प्रेसींगचा शुभारंभ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उमंग व्हाइट गोल्ड प्रा.लि.कंपनीच्या विद्यमाने सर्व सोयी सुविधायुक्त अत्याधुनिक जिनींग व प्रेसींगचा शुभारंभ आज कन्नड घाट रस्त्यांवरील रांजणगाव शिवारात करण्यात आला. आज सकाळी अकरा वाजता कपाशी गाडीचे काटापूजन करुन विधिवत कापुस खरेदीला सुरुवात करण्यात आली.
आज खान्देशातील पहिले अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या उमंग व्हाइट गोल्ड कंपनी संचलीत जीनिंग व प्रेसींग फॅक्टरीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव निकम, दरेगावचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील, उमंग व्हाइट गोल्ड कंपनीचे संचालक प्रशांत वाघ,सी.सी.आयचे चोपडे साहेब, प्रमोद पाटील, देवगिरी बँकेचे चाळीसगांव शाखेचे व्यवस्थापक जिवन राजूरकर,पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, टेकवाडे सरपंच वाल्मीक पाटील, रांजणगाव सरपंच शेखर निंबाळकर,दहीवद सरपंच नवल पवार,माजी पं.स.सदस्य रविभाऊ चौधरी, बाणगाव सरपंच संजय परदेशी,खेर्डे सरपंच नंदकुमार पाटील,पैठणी उद्योजक माधव रणदिवे, भरत राठोड, सुदामभाऊ चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नरेन काका जैन, उद्योजक समकित छाजेड, रवि आबा राजपूत, लोणजे ग्रा.पं.सदस्य संदीप राठोड ,अनिल चव्हाण आजी माजी सरपंच शेतकरी, व्यापारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
*कापूस खरेदीला सुरुवात*
आज विधिवत काटा पूजन करुन कापुस खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांसह नितिन धाडीवाल, सोपान पाटील, छगन पाटील, भाऊसाहेब वाणी, नवल पाटील, किशोर पवार, पंढरीनाथ पाटील, प्रकाश पाटील, जितू पाटील, गुड्डू पिंजारी आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.
यंदा बऱ्यापैकी हंगाम असल्याने कापुस उत्पादन मोठया प्रमाणावर झाले आहे. परिसरातील शेतकरी व व्यापारी बांधव यांच्याकडून आज पहिल्याच दिवशी कापूस खरेदीला भरघोस प्रतिसाद लाभला. आपल्या गाव शिवारात कापूस विक्रीची सोय उपलब्ध झाल्याने कापुस उत्पादक शेतकरी व व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम