बाजारात तुरीची आवक कमी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १९ डिसेंबर २०२२ I देशात खरिपातील तूर काढणी आता वेगाने सुरु आहे. मात्र त्या प्रमाणात बाजारातील आवक वाढली नाही. सध्या बाजारातील तूर आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

 

कमी आवकेमुळं तुरीचे दर टिकून आहेत. सध्या देशातील बाजारात तुरीला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. यंदा शेतकरी कापूस आणि सोयाबीनप्रमाणं तुरीची विक्री टप्प्याटप्प्याने करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचा दर तेजीत राहण्याचा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम