कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ | देशातील सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता १५ दिवस झाले असून सोयाबीन काढणी जोमात सुरु आहे. असं असलं तरी मागील १५ ते २० दिवसांपासून देशातील काही भागांमध्ये पाऊस पडत असून पावसामुळे सोयाबीन काढणीच्या कामात व्यत्यय येत आहे. परिणामी अनेक भागांत सोयाबीन पीक काढणीला येऊनही शेतातच आहे. सध्या सोयाबीनचे दर आटोक्यात आहेत. मात्र दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकरी सोयाबीन विक्री होत आहे. त्यामुळं देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये सध्या सोयाबीन आवक वाढली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातही अनेक बाजारांमध्ये सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. जाणकारांच्या सध्या आवक वाढत असल्यानं दर काहीसे स्थिरावले. मात्र दिवाळीनंतर शेतकरी विक्री कमी करण्याची शक्यता आहे. तसंच नुकसान वाढल्यानं दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास शेतकरी पुन्हा सोयाबीन रोखतील. परिणामी बाजार दरात सुधारणा होण्यास मदत होईल. सध्या नव्या सोयाबीनला ४ हजार ४ हजार ६०० रुपये दर मिळतोय. तर जुने सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयानं विकले जात असून सध्या सोयाबीनचं नेमके किती नुकसान झाले आहे याबाबत निश्चित आकडा उपलब्ध नाही. मात्र या महिन्याच्या शेवटी नुकसानीचा आकडा येऊ शकतो. नुकसान जास्त असल्यास दरात सुधारणा होऊ शकते. सध्या शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपये दर लक्षात ठेऊन सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरु शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम