गुळाला ३ हजर ६०० पर्यंत मिळतोय दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | राज्यात परतीचा पाऊस थांबल्यानंतर गुऱ्हाळे आता सुरु झाली आहेत. तर दिवाळी पाडव्याला मुहुर्ताचे सौदे होऊन गूळ बाजारही सुरु झाला. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच गुळाला अपेक्षित दर मिळातानाही दिसत नसून उत्पादकांना गुळासाठी ४ हजारांपेक्षा जास्त दर अपेक्षित आहे. तर बाजारमध्ये सध्या केवळ सरासरी ३ हजार ३०० ते ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज गूळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम