कृषी सेवक I १४ डिसेंबर २०२२ I भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन हे 14 ते 18 डिसेंबर पुण्यात होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र भोसरीजवळ मोशी येथे होणार आहे. यात शेतकर्यांचा मेळा बघायला मिळणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याने शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शनात कृषी जागरणची टीम सहभागी झाली आहे. 15 एकर या प्रदर्शनाचा परिसर असणार आहे. यात 500 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनं सादर करणार आहेत.
प्रदर्शनात 5 दिवसांमध्ये देशभरातून दीड लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा किसान प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.
जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु होणार; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय
प्रदर्शनात ५ दिवसांमध्ये देशभरातून दीड लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील, असा अंदाज आहे. किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य आणि शेती क्षेत्रातील मान्यवर संस्था यांचा सहभाग अन् सहकार्य लाभणार आहे.
पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्या ८० हून अधिक आस्थापनांचा सहभाग, हे कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम