ऊस तोडणी यंत्रासाठी मिळणार इतके अनुदान

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १४ डिसेंबर २०२२ I ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्र शासनाने राज्याला विशेष भाग म्हणून ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी 192 कोटी 78 लाख रुपये मंजूर केले आहेत व ही मंजुरी सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

यामध्ये राज्य शासनाचा 128 कोटींचा हिस्सा राहणार असून दोघं मिळून या योजनेसाठी 320 कोटी रुपये मिळणार आहेत. या निधीच्या माध्यमातून राज्यात नवीन 900 ऊस तोडणी यंत्र उपलब्ध होतील या यंत्रांचा लाभ हा वैयक्तिक शेतकरी, उद्योजक आणि साखर कारखान्यांना दिला जाणार आहे.सध्या जर महाराष्ट्रातील ऊसतोड यंत्रांची परिस्थिती पाहिली तर सध्या 800 ते सव्वा आठशे ऊस तोडणी यंत्र उपलब्ध आहेत. आता नव्याने 900 ऊस तोडणी यंत्रांसाठी 320 कोटींचे अनुदान मिळणार असल्यामुळे राज्यामध्ये 1700 हून अधिक ऊस तोडणी यंत्र आता उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या अभावी रखडणारा ऊस तोडणीचा प्रश्न आता निकाली निघणार असून या गाळप हंगामात अधिकाधिक उसाचे गाळप करणे शक्य होणार आहे. तसेच अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील संपुष्टात येईल अशी एक शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या यंत्रामुळे फायदा होणार असून रोजगाराच्या देखील संधी निर्माण होतील.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम