जाणून घ्या ऊस लागवडीच्या प्रमुख पद्धती; उत्पादनात होईल मोठी वाढ!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ एप्रिल २०२४ | महाराष्ट्रात सध्या ऊस हे प्रमुख पीक आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड केली जाते. परंतु, आता ऊस लागवडीच्या अशा काही पद्धती आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. याशिवाय ऊस शेतीसाठीच्या पाण्यामध्ये देखील बचत होणार आहे.

 

महाराष्ट्रात शेतकरी पारंपारिक सरी-वरंधा पद्धतीने ऊस लागवड करतात. परंतु, ऊस लागवडीची ‘नाली पद्धती’ आता शेतकऱ्यांसाठी प्रभावी ठरत आहे. तसेच, ‘खड्डा पद्धती’ देखील शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्यासाठी प्रभावी ठरत आहे.

 

paid add

1. नाली पद्धती : शेतकऱ्यांना एक फूट खोल आणि एक फूट रुंद नाली खोदायची आहे. दोन नाल्यांमधील अंतर हे 4 फूट इतके ठेवायचे आहे. उन्हाळयाच्या लागवडीदरम्यान हे अंतर कमी ठेवले तरी चालेल. परंतु, ऑक्टोबरच्या लागवडीसाठी हे अंतर ४ फूट असणे आवश्यक असते. या खोदलेल्या नालीमध्ये शेतकऱ्यांना आधीच खतांचा डोस द्यायचा आहे. यामध्ये प्रति हेक्टरी १०० किलो यूरिया, १३० किलो डीएपी आणि १०० किलो पोटॅशचे प्रमाण ठेवायचे आहे. ज्यामुळे उसाच्या उगवणीला फायदा होतो.

2. खड्डा पद्धती : या पद्धतीमध्ये एक गोलाकार आकाराचा खड्डा खोदला जातो. गोलाकार पद्धतीने ऊस लागवड केली जाते. कमी पाण्याचा प्रदेश असलेल्या भागात ही पद्धती वरदान ठरली आहे. कारण या पद्धतीमुळे पाण्याची बचत होण्यास मदत होते. याशिवाय उसाच्या उत्पादनात वाढ होण्यास देखील मदत होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम