कापूस दर पुन्हा घसरले; ८ हजाराच्या आत घसरण!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ एप्रिल २०२४ | महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेने जोर धरला आहे. याउलट महाराष्ट्रातील कापूस दरात पडझड सुरूच आहे. गेले काही दिवस ८ हजारांच्या वरती गेलेले कापूस दर पुन्हा खाली दगावले आहे. आज देउळगाव राजा बाजार समितीत कापसाला महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल ८००० रुपये ते किमान ७००० रुपये तर सरासरी ७८५० रुपये प्रति क्विंटल चा भाव मिळाला आहे.

राळेगाव (यवतमाळ) बाजार समितीत आज ४९०० क्विंटल आवक झाली, कमाल ७७५० रुपये ते किमान ७००० रुपये तर सरासरी ७६२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मारेगाव (यवतमाळ) बाजार समितीत आज ४७७ क्विंटल आवक झाली, कमाल ७७५० रुपये ते किमान ६९५० रुपये तर सरासरी ७३५० रुपये प्रति क्विंटल, वरोरा (यवतमाळ) बाजार समितीत आज ७७७ क्विंटल आवक झाली, कमाल ७७०१ रुपये ते किमान ६००० रुपये तर सरासरी ७००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

paid add

वरोरा-खांबाडा (चंद्रपूर) बाजार समितीत आज २२१ क्विंटल आवक झाली, कमाल ७६५० रुपये ते किमान ६५०० रुपये तर सरासरी ७००० रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज ५५ क्विंटल आवक झाली, कमाल ७५०० रुपये ते किमान ७००० रुपये तर सरासरी ७२५० रुपये प्रति क्विंटल, पारशिवनी बाजार समितीत आज ७६७ क्विंटल आवक झाली, कमाल ७२७५ रुपये ते किमान ६७५० रुपये तर सरासरी ७१५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम