कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ |राजस्थानसह संपूर्ण देशात जनावरातील लम्पी त्वचारोगाचा धोका वाढत असून महाराष्ट्रातही जनावरांना या आजाराची लागण होत आहे. मात्र, यासाठी शासनाकडून लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. औरंगाबादजिल्ह्यात लम्पी रोगापासून जनावरांना वाचवण्यासाठी लसीकरणाकडे लक्ष दिले जात आहे.मात्र अजूनही सुमारे वीस हजार जनावरे लसीकरणापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याकडे उपलब्ध लसींचा साठा संपला आहे. अशा स्थितीत लसीकरण मोहीम थांबणार तर नाही ना, अशी भीती पशुमालकांना लागून राहिलेली आहे.
जिल्ह्यात एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ जनावरे आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने जिल्ह्यात एकूण ५ लाख २२ हजार लसींचा साठा उपलब्ध करून दिला होता. दरम्यान, ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ९२३ जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. हे प्रमाण ९७ टक्के आहे. जिल्ह्यात अद्यापही सुमारे २० हजार जनावरे लसीकरणापासून वंचित आहेत. आता प्रशासनाकडून उर्वरित लसीचा साठा कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम