कृषी सेवक । १६ जानेवारी २०२३ । नेहमीच शेतात येणाऱ्या प्रत्येक भाजीपाला आपण आपल्या आहारात घेतात तसेच बाबू पासून देखील आपण आपल्या आहारातील काही पदार्थ बनवू शकतो. बांधकामासाठी वापरला जाणारा हा खाल्ला देखील जातो. म्हणजे आमटीपासून भाजीपर्यंत आणि त्याचबरोबर सूपसारखे अनेक चविष्ट पदार्थ बांबूपासून बनवले जातात. घराच्या डागडूजीचे काम असुदे किंवा मग शेतात एखादं काम असुदे, दरवेळीच अशा प्रकारच्या कामांसाठी बांबू हा एक उत्तम पर्याय समजला जातो.
पण तुम्हाला माहितीये का कि बांधकामासाठी वापरला जाणारा हा खाल्ला देखील जातो. म्हणजे आमटीपासून भाजीपर्यंत आणि त्याचबरोबर सूपसारखे अनेक चविष्ट पदार्थ बांबूपासून बनवले जातात. पण, जर तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या काही चविष्ट पदार्थांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही दही कढी किंवा बेसनापासून तयार केलेली कढी नक्कीच खाल्ली असेल, पण आज आम्ही तुम्हाला बांबू कढी कशी बनवायची हे सांगणार आहोत? ही कढी बांबूच्या कोंबांपासून बनवली जाते.
बांबू अंकुर – २-३
टोमॅटो – १ (बारीक चिरलेला)
कांदा – २ (बारीक चिरलेला)
तेल – आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
हिरवी मिरची – २
बेसन – १ वाटी
कढीपत्ता – ६-७
मोहरी – १ टीस्पून
पाणी – ४ ग्लास
सर्व प्रथम, एका भांड्यात पाणी भरून त्यात बांबूचा अंकुर १५-२० मिनिटे उकळण्यासाठी ठेवा. आता कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता, मोहरी, कांदा आणि टोमॅटो घालून चांगले शिजवून घ्या. मसाला शिजल्यावर त्यात मीठ, बेसन आणि चिरलेली हिरवी मिरची टाका आणि २ ग्लास पाणी घाला. आता भांड्यातून बांबू काढा आणि त्याचे लहान तुकडे करा जेणेकरून ते करीमध्ये व्यवस्थित शिजेल. त्यानंतर कापलेला बांबू कढईत टाका आणि कढी थोडी घट्ट झाल्यावर उरलेले २ ग्लास पाणी घाला. आता कढी मंद आचेवर ३० मिनिटे शिजू द्या आणि शिजल्यावर गरम गरम सर्व्ह करा. तुम्ही आतापर्यंत शाकाहारी आणि मांसाहारी म्हणजेच विविध भाज्या आणि मांसापासून बनलेली बिर्याणी खाल्ली असेल मात्र, तुम्हाला माहिती आहे का? कि बांबू पासून देखील बिर्याणी बनवता येते आणि आता त्याचबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
५०० ग्रॅम चिकन
२ टेबलस्पून मीठ
१ टीस्पून काळीमिरी
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणे पावडर
१/२ टीस्पून जिरे
१ टीस्पून बिर्याणी मसाला
२ इंच आले
१० लसणीच्या पाकळ्या
वाटीभर कोथिंबीर आणि पुदिना
दही
२ कप बासमती तांदूळ
४ टीस्पून तेल किंवा तूप
पाणी
तळलेला कांदा
एक मिक्सिंग बाउलमध्ये चिकन काढून घ्या. अख्खे मसाले, मीठ, हळद, लाल तिखट,बिर्याणी मसाला, आलं-लसूण पेस्ट, धणे, तळलेला कांदा, दही, पुदिना आणि कोथिंबीर एकत्र करून चिकन एक तास मॅरीनेट होण्यासाठी ठेवा. आता एका भांड्यात तांदूळ काढून घ्या आणि ख्खे मसाले, मीठ, हळद, लाल तिखट,बिर्याणी मसाला, आलं-लसूण पेस्ट, धणे, तळलेला कांदा एकत्र करून तांदूळ मॅरीनेट होण्यासाठी एका बाजूला ठेवा. आता एक बांबू घ्या आणि तो नीट साफ करून घ्या. त्यानंतर बांबूच्या चिकन आणि भाताचे थर लावा आणि बांबू ऍलुमिनियम फॉईलमध्ये कव्हर करून एका भांड्यात थोडे पाणी टाकून ते उकळावं ठेवा. ३० ते ४० मिनिटे शिजवल्यावर तुम्ही बांबू बिर्याणी तयार होईल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम