मेक्सिकोचा जीएम मका आयात बंद करण्याचा निर्णय

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ |मेक्सिकोने जीएम मक्याच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मेक्सिकोच्या कृषीमंत्र्यांनी आपण बंदीच्या निर्णयावर कायम असून, नाॅन जीएम मक्याच्या उपलब्धतेचे पर्यायही तयार असल्याचे सांगितले.जगात मका आयात करणारा मेक्सिको महत्वाचा देश आहे. अमेरिकेच्या मक्याचा मक्सिको मोठा ग्राहक आहे. मेक्सिको दरवर्षी अमेरिकेतून जवळपास १७० लाख टन मका आयात करतो. मात्र मेक्सिकोने २०२४ पासून जणुकीय सुधारित म्हणजेच जीएम मका आयात बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मेक्सिकोला मक्याची टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम