कृषीसेवक | २६ ऑक्टोबर २०२३
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दि.२६ ऑक्टोबर रोजी राज्यातील शिर्डी येथे आले असतांना त्यांनी आज त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते निळवंडे प्रकल्प सुरु झाला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींचे कौतुक केले आहे.
गेल्या नऊ वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सिंचनासाठी 30 हजार कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आम्ही सिचंनाची कामे पूर्ण करु शकलो असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
साई भूमितील विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे याचा आनंद आहे. जगभरातून साईभक्त सातत्यानं या ठिकाणी येतात. याठिकाणी विविध उपक्रम येत आहेत. निळवंडे सारखा प्रकल्प सुरु होत आहे. माझ्या जन्माच्या पूर्वी हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आज त्याचे उद्घाटन तुमच्या हस्ते होत आहे याचा आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले.
केंद्र सरकार दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. हे पैसे तीन हफ्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार देखील दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. आज अन्य अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत असल्याचे फडणवीस म्हणाले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम