राज्यातील मोसंबी शेतकऱ्यांना दुष्काळामुळे बसला फटका !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १६ ऑक्टोबर २०२३

राज्यातील पैठण तालुक्यातील नावलौकिक प्रसिद्ध व गोड रसेली मोसंबीला यंदाच्या दुष्काळामुळे फटका बसणार आहेत. पाण्याअभावी शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. यंदा मोसंबीसह अन्य फळबागा जगविणे अत्यंत जिकिरीचे ठरणार असून समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरी व कूपनलिका कोरडे पडलेले दिसत आहे. यामुळे मोसंबीसह इतर बागांचे मोठ्या प्रमाणात कधी न भरुन निघणारे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकर्‍यांवर येऊन ठेपली आहे. नजरे समोर हिरव्या बागा उन्हाळात वाळून त्याचे सरपण झाले आहे. या बागातून शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

मोसंबीमुळे पैठण तालुक्याला सात समुद्राबाहेर सुध्दा उच्चारले जाते. येथील मोसंबीच्या हिरव्या बागा अमराईचे जणू माहेरघरच आहे. दरवर्षी मोसंबी खरेदी विक्रीतून कोट्यावधींची उलाढाल होत असते. शिवाय मजुरांच्या हाताला कामही उपलब्ध होते. तालुक्यातील मोसंबीला मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकत्ता, जयपूर, हैद्राबाद, बेंग्लुरु, एवढेच नव्हेतर परदेशातसुध्दा निर्यात होते. मोसंबीच्या देवाण घेवाणीवरुन वर्षाला कोट्यावधीची व्यवहार होते. परंतु पूर्वीची स्थिती आता उरलेली नाही. दुष्काळ हा जणू काय शेतकऱ्यांच्या पाजविला पूजलेला दिसतो. दोन – तीन वर्षे समाधानकारक पाऊस पडला की, पुढची दोन तीन वर्षे दुष्काळ परिस्थितीत उद्भवते. यामुळे पाणीटंचाईने दरवर्षी भीषण रूप धारण केल्याने गतवर्षी जिवंत राहिलेल्या मोसंबीच्या बागा आता माञ जिवंत राहते की नाही याची शाश्वतीच राहिली नसून यंदा पावसाळा म्हणून वाटलाच नाही भर पावसात एकदाही खळखळाट पाऊस वाहिलेला नजरेस पडला नाही. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाया गेले पाठोपाठ रब्बी सुध्दा वाया जाते की काय? अशी धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे.

यंदा पावसाळ्यात भरपूर पाऊस न झाल्याने पावसाळ्यातूनच पाणी टंचाईचे चटके बसण्यात सुरूवात झाली. येणाऱ्या दिवसात सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्षय निर्माण होऊन मोसंबी बागाच्या मुळावर पडणार असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात बागा सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकरी आतापासूनच मोठे नुकसान नको म्हणून मोसंबी बागांवर कुर्‍हाड चालवित आहेत. पैठण तालुक्यात साद्याच्या स्थितीत ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मोसंबी, डाळिब व अन्य फळबागांची लागवड करण्यात आली आहे. फळधारक शेतकरी ठिबक व मल्चिंग पेपरचा वापर करत आहेत.परिसरातील विहिरींना ताहन भागविण्यापूरते पाणी शिल्लक आहे, त्यामुळे तळ गाठलेल्या विहिरीचे पाणी कधी संपून जाईल याचे भरोसा राहिला नाही. मोसंबीच्या उत्पन्नावर परिसरातील शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान उंचावले होते पण पाण्याअभावी मोसंबीचे उत्पन्न कमालीचे घटल्याने शेतकऱ्यांवर हलाकीचे दिवस आले आहेत. तालुक्यातील पाचोड, आडूळ, बालानगर, नांदर,दावरवाडी, खादगाव, कुतूबखेडा, रांजनगाव दांडगा, रजापूर, एकतूनी, केकत जळगाव, परिसरात पाणी पातळी दिवसेंदिवस खाळवत चालल्याने पाणी टंचाई भीषण रुप धारण करत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम