फुल उत्पादक शेतकरी आनंदात ; सणाच्या दिवसात मिळतोय चांगला दर !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १६ ऑक्टोबर २०२३

राज्यात गणपती विसर्जन नंतर एकापाठोपाठ एक सण येत आहे. या सणामध्ये फुलांना मोठे महत्व असून यासाठी अनेक शेतकरी फुलांची निर्यात करण्यासाठी सज्ज देखील झाले आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे जरा चागंले दिवस येणार आहे. फुलांना बाजारात चांगला दर देखील मिळत आहे. त्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. सध्या धुळे जिल्ह्यात फुलांना मोठी मागणी वाढली आहे.

१५ ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवा सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये फुलांना मागणी वाढली आहे. त्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारामध्ये फुलाला चांगला दर मिळत आहे. भर पावसाळ्यामध्ये गेले तीन ते चार महिने पिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्यावाचून शेतातच उभी जळून गेली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नसल्यानं शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशातच सध्या मात्र नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या बाजारात 100 रुपये किलो या दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. दसऱ्यापर्यंत हे भाव 150 ते 200 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच पावसामुळं झालेलं नुकसान यामुळे फुलांचे दर यंदा चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे.

धुळे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात फुलांची आवक सुरु आहे. ही आवक नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून होत आहे. यामुळं एकीकडे फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असला तरी दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना फुले खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम