मदर डेअरीने दुधाच्या दरात केली वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ | दूध दरात गेल्या काही दिवसांपासून अनेकदा वाढ होत आहे. आता देखील मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली असून फुल क्रीम दूध आता 63 रुपयांऐवजी 64 रुपये प्रतिलिटरने मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

मदर डेअरीने चौथ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.16 ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर शहरांमध्ये गायीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. मार्च आणि ऑगस्टमध्येही दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवले होते.

यामुळे अनेकदा वाढ होत आहे, शेतकऱ्यांना देखील पैसे दिले जात आहेत. शेतकऱ्यांना देखील दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. यामुळे शेतकरी देखील समाधानी आहेत.

आता मदर डेअरीने टोकन दुधाच्या दरात प्रतिलिटर 48 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत दरवाढ केली आहे. मदर डेअरीच्या वाढलेल्या किमती आज पासून लागू केले जाणार आहेत. यामुळे आता वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम