मालेगाव बाजार समितीमध्ये मक्याची मोठ्या प्रमाणात आवक

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ | बाजरी, मका, कापूस, सोयाबीन, भुईमूग व कांदा रोपे अशा ५ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीतून वाचलेला अथवा कमी प्रमाणात ओला झालेला मका मालेगाव येथील कृषी बाजार समितीत विक्रीस आणला जात आहे.

paid add

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सत्रात १०० ते १५० लहान- मोठ्या वाहनातून तीन हजार क्विटल मक्यांची आवक होत आहे. लिलावात मक्यास जास्तीत जास्त दोन हजार २५० तर कमीत कमी एक हजार ४५० तर सरासरी एक हजार ७०० रुपये प्रति क्विटल बाजारभाव मिळत आहे. अधिक दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी स्वच्छ व वाळविलेला मका विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम