लसणाला ३ हजारांपर्यंत भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २६ डिसेंबर २०२२ I बाजारात सध्या लसणाला सरासरी दर मिळत आहे. मागील महिन्यापासून लसणाचे दर टिकून आहेत. मात्र मागील तीन महिन्यांच्या सरासरीचा विचार करता दरात काहीशी वाढ झाली आहे.

 

सध्या लसणाला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार २०० ते ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यंदा लसणाचे उत्पादन चांगले असल्याने दरात जास्त वाढ होण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे लसणाचे दर पुढील काळात याच भावपातळीदरम्यान राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम