हळदीला हजार ६ ते ८ हजार रुपये दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २६ डिसेंबर २०२२ I ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हळद पिकाचे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र फारसे नुकसान झाले नाही. सध्या हळद पिकास पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा उत्पादन वाढीची शक्यता आहे.

 

तसेच निर्यातही वाढण्याचा अंदाज आहे. मागीलवर्षी देशातून १ लाख ५३ हजार १५४ टन हळदीची निर्यात झाली होती. मात्र चालू हंगामात गेल्यावर्षीपेक्षा १० टक्के अधिक निर्यात होण्याची आशा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हळदीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज आहे. सध्या हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतो. हा दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज हळद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम