मूग, उडीद व सोयाबीन पिकाची हमी भावाने खरेदी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १७ नोव्हेंबर २०२२ | हंगाम 2022-23 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत मूग, उडीद व सोयाबीन या शेतमालाची शासनाने हमी भावाने खरेदी करण्यासाठी शेतकरी नोंदणी व खरेदी सुरू केलेली आहे. जिल्ह्यामध्ये पारनेर, पाथर्डी, कर्जत, राहुरी, साकत, मांडवगण व बोधेगाव या सात ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांनी हमीभाव योजने अंतर्गत सुरू असलेल्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केले आहे.

हंगाम 2022-23 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत मूग, उडीद व सोयाबीन या शेतमालाची शासनाने हमी भावाने खरेदी सुरू केलेली आहे. मुगासाठी 7 हजार 755 प्रति क्विंटल, उडिदसाठी 6 हजार 600 प्रति क्विंटल व सोयाबीनसाठी 4 हजार 300 प्रति क्विंटल प्रमाणे दर निश्चित केलेले आहेत.

तसेच मंजूर केंद्रावर 4 नोव्हेंबर, 2022 पासून शेतकरी शेतमाल नोंदणी सुरू करण्यात आलेली असून 10 नोव्हेंबर, 2022 ते 7 फेब्रुवारी, 2023 असा खरेदी कालावधी शासनाने निश्चित केलेला आहे. या योजनेमध्ये शेतमाल नोंदणीसाठी संबंधित शेतकर्‍यांचे आधारकार्ड, 7/12 उतारा, चालू हंगामातील ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला 8 अ, बँक पासबुक, धनादेश छायांकीत प्रत आदी कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक असल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम