कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | रब्बी हंगामासाठी यंदा परतीचा पाऊस पावला असून, खरिपात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. त्यामुळेच रब्बी हंगाम या वर्षात किमान तीन लाख हेक्टरवर पोहोचू शकतो. यामध्ये सर्वाधिक हरभऱ्याची लागवड होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
लागवडीमध्ये प्रामुख्याने हरभरा दोन लाख १८ हजार ३०० हेक्टर, रब्बी ज्वारी १०,७३५, करडई दीड हजार, मका २०,७८० हेक्टर, तर गव्हाची लागवड ५५ हजार हेक्टरवर होऊ शकते. जिल्ह्यात हरभरा, गहू, मका या तीन पिकांचीच प्रामुख्याने लागवड होणार असल्याचे गृहीत धरत बियाणे, खतांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात घाटावरील तालुक्यांमध्ये खरिपात सोयाबीनची लागवड केली जाते. सोयाबीन काढून नंतर रब्बीत शेतकरी हरभऱ्याचे पीक घेतात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम