अकोला जिल्ह्यात गहू,हरभरा पेरणीसाठी चांगले वातावरण

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | जिल्ह्यात पावसाने पाय काढला असून, आता हवामान कोरडे झाले आहे. थंडीचा जोर वाढला असून, धुक्याची चादर ओढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रब्बीतील हरभरा, गहू पेरणीसाठी चांगले वातावरण तयार झाले असून शेतकर्याची रब्बी पिकाच्या लागवडीसाठी लगबग वाढली आहे .
तसेच शेतकऱ्यांना सोयाबीनची मळणी, कापसाची वेचणी सुरू झालेली आहे. रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्यात शेतकरी व्यस्त झालेला आहे. हरभरा व गहू पेरणीसाठी २० नोव्हेंबरपर्यंतयोग्य काळ आहे. त्यामुळे हा काळ साधण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

paid add

जिल्ह्यात प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात रब्बी हंगामात हरभरा लागवडीवर शेतकऱ्यांचा जोर असतो. खारपाण पट्ट्यातील हरभरा उत्पादन हे वैशिष्ट्यपूर्ण समजले जाते. या शेतकऱ्यांना हरभऱ्याचा उताराही चांगला ८ ते १० क्विंटलपर्यंत मिळत असतो. यंदा पाऊस जास्त झाल्याने खारपाण पट्ट्यात सोयाबीनची लागवड केलेल्यांना चांगलाच फटका बसलेला आहे. त्यामुळे ही झळ रब्बीतून कमी करण्यासाठी शेतकरी प्रयत्नरत झाले आहेत. जिल्ह्यात रब्बीत हरभऱ्याची सुमारे ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केली जाते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम