रेशनधारकांना अचूक धान्य मिळणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | मोदी सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत मोफत अन्नधान्य देणार असल्याचं आधीच जाहीर केलं. ‘वन नेशन वन रेशन’ही केंद्र सरकारची महत्त्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना देशभरात लागू झाली. यानंतर आता सर्व शिधादुकानांमध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस बंधनकारक केलं आहे.

याचे अनेक फायदे आहेत, यामुळे आता रेशनधारकांना अचूक अन्नधान्य मिळेल. यामुळे मापात पाप होणार नाही.या निर्णयामुळे देशातील कोटी रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.दुकानदार शिधा देताना काटा मारतात.

अनेकदा यामुळे मोठ्या प्रमाणावर काळा बाजार देखील केला जातो. अनेकजण मापात पाप करतात, अशा अनेक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. मात्र हा नियम लागू झाल्याने मापात पाप करण्याची शक्यताच नाहीशी झाली आहे, यामुळे सर्वांना नियमानुसार धान्य मिळणार आहे. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार बदल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम