कृषीसेवक | २६ नोव्हेबर २०२३
अनेक शेतकरी शेतीसोबत दुय्यम व्यवसाय म्हणून पशुपालन करीत असतात, यातून त्यांना मोठे उत्पन्न देखील होत असते. पण सध्या भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक म्हशीची जात म्हणून मुर्राह ही मानली जात असून ही म्हैस दिवसाला सरासरी 25 ते 30 लिटर दूध देते.
उत्तर भारतात ही म्हैस मोठ्या प्रमाणात पाळली जाते. मुर्राह म्हशीच्या दुधात फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. मुर्रा दूध प्यायल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि फॅट मिळते. या म्हशीच्या दुधाचा उपयोग दही, ताक, तूप आणि लोणी यांसारखे अनेक प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी देखील केला जातो. मुर्राह म्हशीची किंमत 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. या म्हशीचे संगोपन करणे खूप फायदेशीर आहे. एक मुर्राह म्हैस एका दिवसात सुमारे 25 लिटर दूध देते.
ज्यानुसार तुम्ही दररोज 1000 ते 1500 रुपये कमवू शकता.हरियाणा, दिल्ली, आणि पंजाबमधील रोहतक, हिसार, जिन्द आणि करनाल या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुर्रा म्हशी आढळतात. परदेशातही इटली, बल्गेरिया, इजिप्त इत्यादी देशात या म्हशी आढळतात. हरियाणामध्ये मर्रा म्हशीला काला सोना असेही म्हणतात. मुर्राह म्हशीबरोबरच मेहसाणा म्हैस देखील एका दिवसात 20 ते 30 लिटर दूध देते. ही म्हैस मुख्यतः गुजरात आणि महाराष्ट्रात आढळते. ही म्हैस दोन्ही राज्यात पाळली जाते. दुसरीकडे, महाराष्ट्रात आढळणारी पंढरपुरी म्हशीची जातही तिच्या दूध उत्पादन क्षमतेसाठी ओळखली जाते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम