परदेशात ‘या’ फुलांना आहे मोठी मागणी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २६ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक राज्यातील शेतकरी विविध प्रकारची शेती करीत आहे पण सध्या अनेक शेतकरी फुलांच्या शेतीकडे मोठा कल असून या शेतीतून लाखो रुपये वर्षभरात कमवीत आहे. यासाठी शासनाकडून अनुदान दिले जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

भारतातून थायलंडलाही रजनीगंधा ही फुले पुरवली जात असून बाजारात अनेक प्रकारची फुले विकली जात आहेत. फुलांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारकडून नवीन शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. जेणेकरून रजनीगंधा फुलांच्या लागवडीत आणखी वाढ होईल. जेणेकरुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल. प्रत्येक राज्यातील शेतकर्यांसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले जातात. जेणेकरुन या शेतीशी संबंधित कोणाला काही समस्या किंवा प्रश्न असल्यास त्यांना त्याची उत्तरे मिळू शकतील.

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शेतकरी प्रामुख्यानं ऊसाची लागवड करतात. कारण हे पीक नगदी आहे. पण अनेक शेतकरी आता रजनीगंधा फुलाची शेती करत आहेत. ही शेती करुन तुम्ही ऊसाच्या पिकापेक्षआ जास्त नफा मिळवू शकता. रजनीगंधा शेती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 24,000 रुपयांचे अनुदान देते. हरियाणातील अनेक शेतकरी गहू, धान आणि इतर पिकांच्या लागवडीपेक्षा फुलांची लागवड करून अधिक नफा कमावत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना दररोज वीस ते तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. दरम्यान, परदेशातही या फुलांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळं रजनीगंधाच्या फुलांना सध्या चांगली किंमत मिळत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम