ग्रामविकास मंत्री महाजांनानी दिले पंचनामे करण्याचे आदेश !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १९ सप्टेंबर २०२३

राज्यातील जळगाव जिल्ह्यात दोन ते तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत शेतपिकांची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत‌.

paid add

संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी, रावेर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. मध्यप्रदेशातील पावसामुळे तापी नदीच्या जलपातळीत झालेल्या वाढीमुळे हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने तसेच तापी नदीचे बॅकवॉटर नदीकाठच्या गावातील शेत पिके व घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या गावातील ६७ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम केले. तलाठी, महसूल सहायक यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. ‌लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. असा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी दिलेल्या आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम