शेतकऱ्यांना फटका : दुसऱ्या दिवशी देखील कांद्याचे लिलाव ठप्प !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २१ सप्टेंबर २०२३ | आज दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव ठप्प आहेत. यामुळे बाजार समितीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या बंदचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेत.

तसंच बंदमध्ये सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने आणि गाळे जप्त करण्यात यावेत, असे आदेश पणन खात्याकडून बाजार समितीला देण्यात आलेत. त्यामुळे व्यापाऱ्यांवर कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारवाईचा अहवाल बाजार समित्यांना आज राज्य सरकारला सादर करायचा आहे. दरम्यान, कांदा प्रश्नावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे. तसंच जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्या पूर्ण करत नाही. तोपर्यंत संप सुरुच राहणार, असा इशारा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने केंद्र सरकारला दिला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम