कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ | उन्हाळी सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वत्र घेतले जाते. तसेच हे कडधान्य म्हणून आणि प्रक्रिया करून देखील वापरले जाते. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयूएस ४७ (परभणी सोना), एमएयूएस ६१ (प्रतिकार), एमएयूएस ६१-२ (प्रतिष्ठा), एमएयूएस ७१ (समृद्धी), एमएयूएस ८१ (शक्ती), एमएयूएस १५८, एमएयूएस १६२ इ.
मान्सुन व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच सोयाबीन ची लागवड करावी. सोयाबीन ची लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते. १ एकरात पेरणीसाठी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ७५ से.मी. आणि दोन रोपांत १० .सें.मी. राहील असे करावे. एका ठिकाणी २ किंवा ३ बिया टोचता येतात. पेरणी करताना जमिनीत फार खोलवर पेरणी करु नये.
पाणी व्यवस्थापन – सोयाबीनमध्ये रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. या कालावधीत १५-२० दिवसात पाऊस कमी झाल्यास या अवस्थेत पिकास पाणी दिल्यास उत्पादनात भर पडते.रोग नियंत्रण – उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. खोड माशी : क्लोरोपायरीफॉस २० टक्के इसी १.५ लि. प्रति है. किंवा ट्रायझेफॉस ४० टक्के इसी ८oo मि.ली. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी आणि पीक फुलो-यात असताना ५oo-७००लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम