कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ | हरभरा पिकात इतर पिकाप्रमाणे उगवनीनंतर वापरण्यात येनारे तननाशक उपलब्ध नाही. त्यामुळे हरबर्याचे तनव्यवस्थापन करण्यासाठी पेरणी झाल्याबरोबर उगवनपुर्व तननाशक वापरावे लागते .उगवनपुर्व तननाशकामधे पेंडीमेथलीन हा घटक असलेले तननाशक वापरावे. याचे प्रमाण एक एकरसाठी 150 ते 160 लिटर पाण्यामधे 700ml पेंडीमेथलीन चे प्रमाण घ्यावे. व ४८ तासाच्या आत मधे फवारणी करावी
खुरपणी कोळपणी करून तनव्यवस्थापन करता येतेत्याचबरोबर हरबरा तनव्यवस्थापन खुरपणी, कोळपणी करून तन व्यवस्थापन करता येते.पण खुरपणी करण्यासाठी जास्त खर्च येत असतो.वेळेवर मजुर उपलब्ध होत नाही. परीणामी पिकाची
आंतरमशागत करण्याला उशिर होतो. वेळेवर तनव्यवस्थापन न झाल्यामुळे उत्पादन कमी येते.हरबर्याच्या पिकात पेरणी मागे तननाशक वापरताना कोणती काळजी घ्यावी.पेरणी मागे तननाशक वापरणार्या भरपुर शेतकर्याचे असे प्रश्न असतात , कि आम्हाला औषधाचा रिझल्ट आला नाही किंवा कमी आला.तर रिजल्ट कमी येण्याचे मुख्य कारण आहे पाण्याचे प्रमाण. काहि शेतकरी औषधाचे प्रमाण जास्त वापरतात आणि
पाणी कमी वापरतात. त्यामुळे जमीन योग्य प्रमाणात भिजत नाही आणी लवकर गवत उगते. पेरणीमागे पेंडीमेथलीन तननाशक फवारताना चांगल्या रिझल्ट साठी 150 ते 160 लिटर पाण्यामधे 700ml पेंडीमेथलीन एक एकरसाठी वापरावे. म्हणजे 15 लिटरच्या पंपसाठी 70ml एवढी मात्रा घ्यावी. फवारणी करताना जमीनीत ओलावा असणे गरजेचे आहे. म्हणजे औषधाचा रिजल्ट चांगल्या प्रकारे येत असतो.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम