सोलापूर दूध संघ पशुखाद्य प्रकल्प सुरू करणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १६ नोव्हेंबर २०२२ | सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीड कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. लवकरच या पैशातून पशुखाद्य प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली. तसेच संघाच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याचा निर्णयही झाला असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली. त्यात हा निर्णय झाला. जिल्हा सहकारी दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या आधी २०१३ मध्ये पगारवाढ करण्यात आली होती. तब्बल नऊ वर्षांनंतर ही वाढ करण्यात येत आहे. मार्च २०२२ मध्ये संचालक मंडळ आल्यानंतर २२० कर्मचारी होते, ते आज कमी होऊन १५२ इतकी झाली असल्याने वेतनावरील भार कमी झाला आहे. ही संख्या आम्हाला शंभरावर आणायची आहे, कामगारांचा पगार ९० टक्क्यांपर्यंत तर इतरांचा पगार वेतनानुसार वाढवण्यात येईल, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ३ लाखांचा बोजा वाढणार असल्याचेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम