ज्वारी लागवड व तंत्रज्ञान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | रब्बी हंगामात शेतकरी चारा व धान्य असा दुहेरी फायदा देणारे ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतात. संकरीत वाणांची निवड व लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान यांचा वापर केल्यास ज्वारीचे जास्त उत्पादन घेणे शक्य आहे. याबाबत जाणून घेऊयात.1. जमिनीची निवड : ज्वारी लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
हलक्या जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहत नाही Moisture does not hold for long in light soils व वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये कमी ओलाव्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन उत्पादन घटते.

2. वाणांची निवड: सुधारित आणि संकरीत वाणांची निवड करावी.3 पेरणीची वेळ : रब्बी ज्वारी लागवडीसाठी पेरणीची योग्य वेळ साधणे महत्वाचे आहे. पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या
ओलीवर पाच सें.मी. खोलीपर्यंत करावी.4. रासायनिक खतमात्रा : माती परीक्षणानुसार पिकाला रासायनिक आणि सेंद्रिय खतांची योग्य मात्रा दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. हलक्या जमिनीमध्ये एकरी 10 किलो नत्र पेरणीचे वेळी द्यावे. मध्यम जमिनीत एकरी 16 किलो नत्र, 8 किलो स्फुरद प्रति एकरी द्यावे. 5. पाणी व्यवस्थापन: ज्वारीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये उपलब्धतेनुसार पाण्याच्या पाळ्या दिल्यास उत्पन्नात वाढ होते. कोरडवाहू ज्वारीला, पिक गर्भावस्थेत असताना 28 ते 30 दिवस पाणी द्यावे.6. कीड व रोग नियंत्रण : उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून 2-3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. दाण्यांवरील बुरशी, पानांवरील करपा, तांबेरा, चिकटा नियंत्रणासाठी, रोगाचा प्रादुर्भावदिसून येताच कॉपर ऑक्सिक्लोराईड (50 डब्ल्यूपी) 3 ग्रॅम किंवा मॅकोझेब (75 डब्ल्यूपी) 3 ग्रॅम फवारावा.7. काढणी व उत्पादन: ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात. दाणे खाऊन पाहिल्यास फुटताना आवाज येतो व ज्वारी पिठाळ लागते. ज्वारी काढणीनंतर 8-10 दिवस उन्हात वाळवून मळणी करावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम