रब्बी हंगामात या पद्धतीने करा सूर्यफूल लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ | वर्षांला दरडोई १७.४ किलो खाद्यतेल वापरले जात होते. तर २०२५ साली वाढत्या लोकसंख्येनुसार आपली तेलाची गरज ३३६ लाख टन इतकी होईल व दरडोई तेलाचा वापर २५.६ किलो होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे देशातर्गत उत्पादन कमी असल्यामुळे आयतीवर भर द्यावा लागत आहे.
तेलाचे उत्पादन वाढवून स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय तेलबिया मिशन हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा आहे. शेतकर्‍याच्या शेतावर राबविलेल्या आद्यारेखीय प्रात्येक्षिकावरूनअसे दिसून आले की सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा १८ ते ४५ टक्के अधिक उत्पादन मिळते म्हणून आहे त्या क्षेत्रात अधिक उत्पादन व अधिक फायदा मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणेअत्यंत महत्वाचे आहे॰ सध्या सूर्यफुलाला रु.६०००/- प्रती क्विंटल पेक्षा अधिक चांगला बाजार भाव मिळत आहे आणि केंद्र सरकारने देखील सूर्यफुलासाठी रु.६०१५/ क्विंटल हमीभव जाहीर केला आहे.भारत रशिया आणि युक्रेनमधून ७०% सूर्यफूल तेल आयात करतो. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रँडेड सूर्यफूल तेलाच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. “सूर्यफूल तेलाची प्रतिलिटर किंमत सहामहिन्यांपूर्वी १४०-१५० रुपयांच्या दरम्यान होती परंतु सध्या मात्र ती २००-२४० च्या दरम्यान आहे,” दोन्ही देशांमधील तणावामुळे पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालाआहे.भारतीय उत्पादकांकडून पुरेसा पुरवठा होत नाही.सूर्यफूल तेलाचा पुरवठा थांबल्यामुळे सूर्यफूल पिकाचे उत्पादन वाढवने गरजेच आहे. या संधीचा फायदा घेयुन मोठ्या प्रमाणात सूर्यफूल या पिकाची लागवड करून तेलबियामध्ये स्वावलंबन आणणे तसेच आरोग्यदायी अशा सूर्यफूल तेलाची उपलब्धता व वापर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकर्‍यांनी या पिकाची लागवड करावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम