‘या’ देशातील सोयाबीन पिकास बसला हवामानाचा फटका

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ६ नोव्हेबर २०२३

जगभरातील अनेक शेतकरी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतात. यात ब्राझील देशातील देखील सोयाबीन उत्पादक देश म्हणून परिचित आहे. या देशातील अनेक राज्यांमध्ये यंदा हवामान अनुकूल नसल्यामुळे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मागील आठवड्याच्या शेवटीपर्यंत ब्राझीलमध्ये केवळ 38.4 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होऊ शकली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 52.3 टक्के क्षेत्रावर झाली होती. मागील दोन आठवड्यांमध्ये हवामानात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी ब्राझीलच्या उत्तर मध्यवर्ती भागात पाऊस खूपच कमी असून, तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले आहे. या दोन पद्धतीच्या हवामानाचा फटका यंदा ब्राझीलच्या सोयाबीन पिकास बसला आहे. लागवडीसाठी या दोन्ही पद्धतीचे हवामान अनुकूल नाहीये. मात्र असे असले तरी जोखीम पत्करून शेतकरी सोयाबीन लागवड करत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम