सोयाबीन शेतकरी चिंतेत भावात झाली घसरण !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३१ जानेवारी २०२३ ।  राज्यातील सोयाबीनाची शेती कारण शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. सोयाबीनाचे भाव वाढतील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. मात्र आज 31 डिसेंबर रोजी सोयाबीनच्या दरात किंचित घसरण दिसून आली. आज दिवसभरात सोयाबीनला लासलगाव विंचूर येथे निचांकी दर मिळाला. लासलगाव शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला कमीत कमी 3000 रुपये तर जास्तित जास्त 5251 रुपये भाव मिळाला.

आज दिवसभरात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक नोंद झाली. यामध्ये एकट्या लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची तब्बल 10 हजार 424 क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी 5100 रुपये तर जास्तित जास्त 5356 रुपये भाव मिळाला. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात राज्यात सर्वाधिक दर हा उमरखेड येथे 5400 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

सोयाबीनचे बाजारभाव मागील काही दिवसांत घसरत असल्याचे दिसत आहे. सध्या सोयाबीनला सरासरी ५००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो आहे. मात्र मागील वर्षी सोयाबीनला ८००० रुपये दर मिळाला होता. यंदा फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचे भाव वाढतील असे म्हटले जात आहे. परंतु सध्या तरी सोयाबीनचे दर घसरतानाच दिसत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम