कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ | भारतातून होणारी सोयापेंड निर्यात पुढील काही महिन्यांत वाढती राहील, असे सॉल्वन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे एसईएचे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी सांगितले.
चालू हंगामात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारताची सोयापेंड निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ८ टक्के घटली. परंतु आता परिस्थिती सुधारत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये निर्यात वाढलीय. ऑक्टोबर महिन्यात ४० हजार १९६ टन सोयापेंड निर्यात झाली. तर सप्टेंबरमध्ये फक्त १३ हजार ७१८ टन सोयापेंड निर्यात झाली होती.
म्हणजे महिनाभरात निर्यातीत सुमारे १९३ टक्के वाढ झाली. महिनाभरापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दराच्या तुलनेत भारतातील सोयापेंड महाग पडत होती. परंतु आता सोयाबीनला प्रति क्विंटल ५७०० ते ५८०० रूपये दर मिळत असून निर्यातीच्या किमतीतही पडतळ बसत आहे.
त्यामुळे निर्यात वाढलीय, असे मेहता म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सायोपेंडेच्या किंमतीत किंचित घट होऊ शकते. भारतातील सोयापेंड निर्यात आता वाढत जाईल, असे त्यांनी सांगितले. सोयापेंड निर्यात वाढल्यास त्याचा सोयाबीन उत्पादकांना थेट फायदा होईल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम