कृषी सेवक । ३ जानेवारी २०२३ । देशातील बाजारात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोयाबीनचे दर नरमले होते. तेव्हापासून डिसेंबर संपला तरी दर कायम होते.
मात्र याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी आली होती. त्यामुळं शेतकरी संभ्रमात होते. मात्र जानेवारीत दर सुधारतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला होता.
त्यानुसार आज सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाला. सोयाबीन दरातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम