कृषी सेवक | ८ एप्रिल २०२४ | विदेशी कोंबडी दिसायला सुंदर आणि उत्साही जातींमध्ये ब्लॅक मिनोर्को’ कोंबडीला विशेष महत्व आहे. स्पेनच्या पश्चिम किनाऱ्यावरील एका सुंदर बेटावर आढळणारी मिनोर्को कोंबडी दिसायला फारच आकर्षक आहे.
सदर कोंबडी एके काळी पांढरे शुभ्र मोठे अंडे घालण्यासाठी प्रसिध्द आहे. मात्र, इतर जातींशी संकर केल्यामुळे तिच्यातील हा गुण नाहीसा झाला.
मिनोर्का कोंबडी तिचे प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि ताठ शरीर यासाठी ओळखली जाते. मिनोर्का कोंबडी शरीराने व्हाईट लेगहार्नपेक्षा लहान असून सर्व पिसे काळेभोर असतात. चोच काळी असते, तुरा तांबडा असतो, कानाची पाळी पांढरी असून इतर कोंबड्यांपेक्षा मोठी असते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन २ किलो तर मादीचे १.५ किलो असते.
जन्मानंतर २० आठवड्यात या कोंबड्यांना लैंगिक परिपक्वता येते. अंडी उत्पादनासाठी पाळली जाणारी ही कोंबडी वर्षभरात सरासरी २०० अंडी देते.
शरीराचा मोठा आकार मात्र दुबळी शरीराची रचना यामुळे मांस उत्पादनासाठी या जाती कमी कार्यक्षम आहेत.
मिनोर्का बहुतेकदा शोभेच्या जाती म्हणून पाळल्या जातात. ही चपळ आणि लाजाळू जात आहे. मुक्त परिसरात राहणे त्यांना आवडते. या कोंबडीची चांगली वाढ होण्यासाठी योग्य काळजी आणि व्यवस्थापन करणे अगदी आवश्यक आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम