शेंदुर्णी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ नोव्हेंबर २०२२ |शेंदुर्णी येथीलशेतकऱ्याने आपल्या शेतातील नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळुन शनिवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी विष प्राषण करून आत्महत्या केली. शेतकरी ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील शेतकरी ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड आपल्या शेतातच दि.१८ नोव्हेंबर रोजी विष प्राषण केले. पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

 

मात्र शनिवार दि.१९ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अडीच एकर कोरडवाहु शेती असलेल्या गायकवाड यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले,एक विवाहित मुलगी असा परिवार असुन त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम