वांगी लागवड करताना अशी घ्या काळजी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्रात विविध भागात आवडीनुसार वांग्याच्या विविध जाती आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची चविष्ट वांगी प्रसिद्ध आहेत. नगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात. खानदेशात भरताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय आहे .

जमिनीची निवड

सुपीक, मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार जमिनीमध्ये वांगी पिकाचे चांगले उत्पादन मिळते. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते वापरल्यास उत्पादन वाढीस फायदा होतो. जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ असल्यास पिकाची वाढ उत्तम होते.

रोपांची पुनर्लागवड

लागवडीपूर्वी जमिनीची उभी-आडवी नांगरट करून चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरंबे तयार कराव्यात.
रोपांची लागवड जास्त वाढणाऱ्या संकरित जातींसाठी ९० ×९० सेंमी आणि हलक्या जमिनीत कमी वाढणारी झुपक्या जातींसाठी ७५ × ७५ सेंमी अंतरावर लागवडीचे अंतर ठेवावे.
आंतरमशागत
१५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमितपणे खुरपणी करून पिकातील तण काढून टाकावे.लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी म्हणजेच झाडांना फुले येणाच्या सुमारास मातीची भर द्यावी.

पाणी व्यवस्थापन
पाण्याचे नियोजन जमीन, हंगाम व हवामानानुसार करावे.फुले व फळे येण्याचा काळ हा अतिशय महत्त्वाचा असतो या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम