कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | कापसाच्या दरात क्विंटलमागे सरासरी ८०० ते एक हजार रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. देशातील बाजारात मागील आठवड्यात कापसाचे किमान दर ससरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांपर्यंत कमी झाले होते. तर कमाल दर ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होता. मात्र आता कापासचा किमान दर सरासरी ८ हजार रुपयांपर्यंत वाढला. तर कमाल दारने ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे.
मागील आठवड्याच्या मध्यापासून कापसाचे दर वाढले. मात्र दर वाढूनही देशातील बाजारात सध्या कापसाची आवक कमी आहे. पण दुसरीकडे उद्योगांकडून कापसाला उठाव मिळतो आहे. त्यामुळे कापसाचे दर मागील काही दिवसांपासून वाढलेले दिसत आहेत. आजही काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. पण सर्वसाधारणपणे विचार केल्यास दर काहीसे स्थिर दिसत होते.
आज बहुतांशी राज्यातील कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोचला होता. तर कमाल दरानं ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. आज महाराष्ट्रातील कापसाचा दर सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहिला. तर गुजरातमध्येही सरासरी ८ हजार ते ९ हजार ३०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. पंजाब, हरियाना, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात याच दरम्यान कापसाचे व्यवहार झाले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम