कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र नऊ टक्क्यांनी वाढले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ देशात कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र नऊ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे. त्यामुळे मागील वर्षी मागणीच्या तुलतेन कमी उत्पादनाचा सामना यंदा करावा लागणार नाही. यंदा देशातील कापसाचे उत्पादन ३४४ लाख गाठी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रायांनी व्यक्त केला.बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेंन्शन सेंटर येथे असोसिएनशच्या शताब्दी महोत्सवात गणात्रा बोलत होते. या महोत्सवाला केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे देशभरातून आलेल्या उद्योजक, शेतकरी आणि पुरवठादारांशी संवाद साधला.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम