गव्हाच्या आधारभूत किमतीत ११० रुपयांची वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ शेतीमालाचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने चालू पीक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) ११० रुपयांनी वाढ करून ती २१२५ रुपये प्रति क्विंटल आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये ४०० रुपयांनी वाढ करून ती ५४५० रुपये प्रति क्विंटल केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीच्या (सीसीईओ) बैठकीत एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या, सरकार खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांत घेतलेल्या २३ पिकांसाठी एमएसपी निश्‍चित करीत असते .

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम