ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ५०० रुपये दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ११ डिसेंबर २०२२ I ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ज्वारीला सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार २०० रुपयांपर्यंत दर होते. मात्र बाजारातील कमी आवक आणि वाढत्या मागणीमुळे मागील दोन महिन्यांमध्ये ज्वारीच्या दरात क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांची सुधारणा झाली आहे.

 

सध्या बाजारात खरिपातील ज्वारीची आवक होत आहे. मात्र तरीही ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. खरिपातील उत्पादन कमी राहल्याचा अंदाज तसेच रब्बी पेरणीला होणारा उशीर आणि वाढती मागणी, यामुळे यंदा ज्वारीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम