केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टाॅक लिमिट काढले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | देशातील बाजारात सोयाबीनची आवक सध्या वाढलेली आहे. तर दुसरीकडे सोयाबीनमधील ओलावा आता कमी येत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढललेले असतनाही देशातील दर काहीसे कमीच आहेत. आता केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टाॅक लिमिट काढले. त्यामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळेल, असे जाणकार सांगत आहेत.

देशात खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने ८ ऑक्टोबर २०२१ मध्ये स्टाॅक लिमिट लावले होते आणि राज्यांना स्टाॅक लिमिट ठरविण्याचे अधिकार दिले होते. मात्र अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे केंद्राने लिमिट ठरवून ३० जून आणि नंतर ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत स्टाॅक लिमिट लावले होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम