कृषी सेवक I २३ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. आज आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात ५ टक्क्यांनी नरमाई दिसली. कापूस दर ८८ सेंट प्रतिपाऊंडवरून ८५ सेंटपर्यंत कमी झाले. तर देशातील बाजारात कापूस स्थिर होता.
कापसाला सरासरी ८ हजार १०० ते ९ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. पुढील काही दिवस कापूस दरात चढ उतार होऊ शकतात. मात्र जानेवारीत कापूस बाजार सुधारु शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम