साखरसाठ्याची अपूर्ण माहिती दिल्यास कारवाई करू – साखर संचालनालय

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | साखर साठयाबाबत साखर कारखान्यानी अर्धवट माहिती देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईचा इशारा केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत साखर व खाद्यतेल संचालनालयाने दिला आहे.

केंद्र शासनाच्या ऑनलाइन ‘पी-२’ प्रणालीत काही साखर कारखाने प्रतिमहा अखेरचा साखरसाठा व्यवस्थित नोंदवत नसल्याचे निदर्शनास आले आहे. साखर साठ्याची माहिती अर्धवट येत असल्यामुळे साखर संचालनालयाला निर्णय घेताना अडचणी येतात. देशातील सर्व साखर कारखान्यांची माहिती एकाचवेळी प्रणालीत उपलब्ध व्हावी, असा प्रयत्न आमचा आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आपली माहिती सनदी लेखापालांच्या (सीए) स्वाक्षरीनिशी राज्याच्या साखर आयुक्तांकडून तपासून घ्यावी, अशा सूचना साखर संचालनालयाने दिल्या आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम