कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I आजही शेतकरी राजांची आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर ती नेहमी खालावलेलीच दिसते. यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत परंतु शेतमालाची विक्री व्यवस्थापन उत्तम पद्धतीने ठेवणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
या समस्येवर आता कृषी विभाग लवकरच तोडगा काढणार असल्याचे समोर येत आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला शेतमाल मातीमोल भावात न विकता तो आता सोन्याच्या भावात विकण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी काम करणार आहेत.
म्हणजेच कृषी विभाग आता आपले विभागाच्या कर्मचाऱ्यांचा वापर हा शेतमालाच्या ब्रँडिंग साठी म्हणजे मार्केटिंग साठी करणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत अजून कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारचे धोरण आखले गेलेले नाही परंतु लवकरच याविषयी सविस्तर धोरण आखले जाईल, असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.
या योजनेच्या बाबतीत कृषी आयुक्तांनी चाचपणी करण्यास देखील सुरुवात केली असून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित होईल असे चित्र दिसत आहे. जर आपण मोठ्या शहरांचा विचार केला या ठिकाणी शेतमालाला चांगली बाजारपेठ असते. त्यामुळे हीच बाब लक्षात ठेवून कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांना शेतमाल मार्केटिंग साठी समन्वयकांची भूमिका बजावण्यासाठी तयार केले जाणार असल्याचे सुनील चव्हाण यांनी नमूद केले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम