वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजारांचे अनुदान

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I शेततळे या योजनेच्या माध्यमातून अनुदानाची सोय शेतकऱ्यांसाठी सरकारकडून करण्यात आलेली आहे.

परंतु आता मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जाणार असून या माध्यमातून एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 930 शेततळे बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे व पुण्यासाठी 600 शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

जर आपण या योजनेचा विचार केला तर यामध्ये शेततळ्याच्या आकारमान किती आहे यानुसार अनुदानाचे स्वरूप ठरवण्यात आलेले आहे. परंतु आकारमानानुसार कमाल 75 हजार पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना यामध्ये मिळते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे असते.

नक्की वाचा:नुकसान भरपाईच्या रकमेत मोठी वाढ; शिंदे-फडणवीस सरकारचे धडाकेबाज निर्णय

ही कागदपत्रे असतात आवश्यक

या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्तीसाठी अर्जदार शेतकरी बांधवांना 7/12 व 8A, बँक पास बुक, आधार कार्ड, परिक्षण अहवाल, जातीचा दाखला, पासपोर्ट फोटो लागणार आहेत. या कागदपत्रांची पूर्तता करून शेतकरी अर्ज करून शकणार आहेत.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत यांनाच मिळतो लाभ

1-शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ केवळ शेतकरीच घेऊ शकतात. म्हणजेच ज्यांच्या नावाने शेतजमीन आहे असेच शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.

2-तसेच अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर किमान एक एकर जमीन असेल तरच तो शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरेल.

3-याशिवाय जर अर्जदार शेतकरी बांधव अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून येत असेल तर त्याला जातीचा दाखला देखील सादर करावा लागणार आहे.

या योजनेअंतर्गत शेततळ्याच्या आकारमानानुसार मिळणारे अनुदान

1-30 बाय 30 बाय 3 मीटर शेततळ्यासाठी 75 हजार पर्यंतच अनुदान मिळू शकते असं या योजनेत प्रावधान आहे.

2-15 बाय 15 बाय 3 मीटर शेततळ्यासाठी या योजनेअंतर्गत 35000 ते 50000 पर्यंतच अनुदान मिळू शकतं.

3-तसेच 30 बाय 15 बाय 3 मीटर शेततळ्यासाठी या योजनेअंतर्गत 50000 च अनुदान देण्याचं प्रावधान आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा करावा अर्ज?

1-या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन घ्यावे लागेल. यासाठी शेतकरी बांधव आपला युजरनेम आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात किंवा आधार कार्ड आणि ओटीपीच्या माध्यमातून देखील लॉगिन घेता येणार आहे.

2-लॉग इन केल्यानंतर होम पेजवर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

3-यानंतर तुम्हाला सिंचन साधने व सुविधा समोरील बाबी निवडा ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी सात बाबींपर्यंत बाबी निवडायच्या आहेत.
4-यानंतर सक्सेस दाखवलं जाईल यावर ok क्लिक करा.

5-नंतर तुमच्याकडे कोणतं सिंचन स्रोत आहे ते निवडा, जसे की, उपसा सिंचन / कूपनलिका / कालवा / शेततळे / विहीर / शेततळे.

6-यानंतर तुम्ही सिंचनासाठी कोणता ऊर्जा स्रोत वापरतात हे निवडायचा आहे. म्हणजेच वीज, सौर ऊर्जा किंवा इंधन चलित पंप यापैकी तुम्ही जे वापरत असाल ते निवडायचे आहे.

7-यानंतर तुम्हाला सिंचनाची सुविधा व उपकरणे निवडावी लागणार आहेत. जसे की ठिबक, तुषार, उपसा सिंचन इत्यादी

8-यानंतर तुम्ही सिंचनासाठी वापरत असलेले उपकरण किती एचपी चा आहे ते निवडा.

9-यानंतर ही बाब सक्सेसफुली ऍड झाल्याचे दिसेल.

10-यानंतर पुन्हा होम पेजवर या आणि पुन्हा अर्ज करा यावर क्लिक करा. सिंचन साधने व सुविधा यामध्ये बाबी निवडा यावर क्लिक करा.

11-यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज खुलेल. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये तुमचा जमिनीचा तपशील आणि वैयक्तिक माहिती भरा आणि यानंतर सिंचन साधने व सुविधा निवडा. यानंतर पर्याय अंतर्गत वैयक्तिक शेततळे वर क्लिक करा.

12-यानंतर तुम्हाला किती आकाराचा शेततळ तयार करायच आहे हे निवडा.

13-यानंतर माहिती जतन करा मग सक्सेस झालं असं दिसेल.

14-पुन्हा तुम्हाला मुखपृष्ठवर नेलं जाईल. या ठिकाणी उजव्या साईडला अर्ज सादर करा क्लिक केल्यानंतर ओके असं नोटिफिकेशन येईल त्यावर क्लिक करा.

15-यानंतर पहा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही ज्या बाबींसाठी अर्ज केला असेल त्या बाबींची यादी येईल त्याला तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करा.

16-यानंतर तुम्हाला पेमेंट करावा लागणार आहे. 23.60 रुपयांचा शुल्क भरावा लागेल.

17-पेमेंट करण्यासाठी आपण यूपीआय, नेट बँकिंग यांसारख्या पर्यायाचा वापर करू शकणार आहात.

18-पेमेंट झाल्यानंतर आपली अर्ज प्रक्रिया पुरी होईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम