शेतकऱ्याचे पिवळ सोन चमकले !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १९ नोव्हेबर २०२३

देशभरात गेल्या काही वर्षापासून अनेक राज्यातील शेतकरी हतबल झाले होते त्यांच्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजनेच्या माध्यमातून दिलासा देत असतांना आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. सोयाबीनचे आगार म्हणून ख्यातनाम असलेल्या हिंगोली जिल्ह्यातून. खरे तर पिवळ सोन अर्थातच सोयाबीनची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश अशा चारही विभागात कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. मात्र मराठवाड्यात आणि विदर्भात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.

संपूर्ण देशाच्या सोयाबीन उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिवाचा वाटा आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादनातल्या महाराष्ट्रात घेतले जाते. तसेच मध्यप्रदेश मध्ये 45 टक्के एवढे विक्रम उत्पादन घेतले जाते. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. एकंदरीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र या नगदी पिकावर अवलंबून आहे. परंतु गेल्या एका वर्षापासून सोयाबीनचे बाजार भाव मंदित होते. दिवाळीच्या पूर्वी सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जात होता. शेतकऱ्यांना मात्र दिवाळीच्या काळात पैशांची निकड भासली होती. हेच कारण आहे की दिवाळीपूर्वी मिळेल त्या भावात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करून टाकली आहे. पण आता दिवाळीनंतर परिस्थिती थोडीशी बदलली आहे. बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी अर्थातच काल 16 नोव्हेंबर 2023 रोजी सोयाबीन दरात दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढे वाढ नमूद करण्यात आली आहे. खरंतर हे मार्केट दिवाळीच्या काळात सात दिवसांसाठी बंद होते. पण काल या मार्केटमध्ये पुन्हा एकदा शेतमालाचे लिलाव सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे लिलाव सुरू झालेत आणि सोयाबीनच्या दरात तब्बल दोनशे रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, येथे गुरुवारी सोयाबीनचा भाव जवळपास दोनशे रुपयांनी वधारला आहे.

या बाजारात काल सोयाबीन किमान ४ हजार ८०० ते कमाल ५ हजार २२१ रुपये या भावात विकला गेला आहे. पण सध्याचा हा भाव लागवडीसाठी आलेला खर्च देखील भरून काढणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणून सोयाबीनला किमान ६ हजार रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा यावेळी उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम