कश्मीरात घेतले जाणारे पिक तरुणाने घेतले खान्देशात !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १९ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक शेतकरी विकसित शेती करीत असून त्यांतून मोठे उत्पन्न देखील घेत आहे. अनेक वर्षापासून शेतकरी तंत्रज्ञानाचा मोठा वापर करून अनेक प्रगती करीत आहे. एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने खान्देशात केशर शेती केल्याने सर्वाना धक्काच बसला आहे. नंदुरबार येथील हर्ष मनीष पाटील नावाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याने ही शेती सुरु केली आहे. भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मीर येथील थंड हवेचा प्रदेश आणि वातावरणात येणारे हे पिक आता महाराष्ट्रासारख्या उष्ण वातावरणीय प्रदेशातही पिकू लागले आहे. शेतीमधील या अनोख्या प्रयोगाची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जाऊ लागली आहे.

हर्ष मनीष पाटील हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी. शिक्षण पूर्ण झाल्यावर काय करायचे हा सवाल त्याच्याही मनात होता. गाव-खेड्यात शिकलेला हा तरुण. अवघ्या 700 ते 800 उंबरा असलेले त्याचे गाव. खेडदिगर असे त्या गावाचे नाव. नंदुरबार जिल्ह्यात जे सातपुडा पर्वतरांगेलगत आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर वसले आहे. प्रचंड उष्ण वातावरण आणि त्या वातावरणात घेतले जाणारे केली उत्पादन हीच या गावची ओळख. असे असले तरी या तरुणाने या ठिकाणी केशर पिकविण्याचा चंग बांधला आणि काम सुरु केले.

 

 

हर्ष हा खरे तर मुंबईत शिकतो. डी. वाय. पाटील महाविद्यालयात तो संगणक विज्ञानाचे शिक्षण घेतो आहे. त्याने वडिलांच्या पारंपरीक शेतीला पर्याय देणारी शेती विकसीत करण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने आव्हान स्वीकारले. मोठे स्वप्न पाहिले. तेही साधेसुधे नव्हे तर कश्मीरचे केशर नंदुरबारमध्ये पिकविण्याचे. आव्हान मोठे होते. काही प्रमाणात अशक्यप्राय. कारण, तंत्रज्ञान, साधन सूविधा उबलब्ध करता येतात. वातावरण आणि निसर्ग कसा आणणार? पण, त्याने ही किमया केली. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केशर शेती वटवली. ती यशस्वी करुन दाखवली. आज त्याच्यानावाची आणि प्रयोगाची चौफेर चर्चा सुरु आहे. कश्मीर पिकण्यासाठी आवश्यक आवश्यक असते थंड वातावरण. जे या तरुण शेतकऱ्याने चक्क 15 बाय 15 च्या खोलीत तयार केले. ही खोली या पठ्ठ्याने आगोदर वातानुकुलीत केली. त्यानंतर त्याे कश्मीर येथील पम्पोर येथून मोगरा प्रजातीचे केशर आणले. वातावरण निर्मिती होण्यासाठी त्याने संपूर्ण खोलीला थर्माकोल चिटकवले. ज्यामुळे मोगरा केशर उगविण्यासाठी पूरक वातावरण तयार झाले. कौतुकास्पद बाब अशी की, आज घडीला मोगरा केशर जवळपास 1000 रुपये किलो आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम